Select Page

आमच्याबद्दल

स्वातंत्र्यपूर्व भारतातील १८८० चा तो काळ…
सुविधांचा अभाव आणि प्रतिकूल परिस्थिती असतानाही देवगडमधील काही द्रष्ट्या शिक्षणप्रेमींनी “देवगडमध्ये शिक्षणाचा दीप प्रज्वलित झाला पाहिजे” हा ध्यास घेतला.
त्या ध्यासातून १८८० पासून सुरू झालेले खाजगी वर्ग पुढे ३ मार्च १९१९ रोजी ‘श्रीराम इंग्लिश स्कूल’ या स्वरूपात अस्तित्वात आले.
देवगड तालुक्यातील माध्यमिक शिक्षणाची ती खऱ्या अर्थाने पायाभरणी ठरली.
यानंतर ९ डिसेंबर १९३३ रोजी मुंबईस्थित देवगडच्या शिक्षणनिष्ठ सुपुत्रांनी एकत्र येऊन ‘देवगड एज्युकेशन बोर्ड’ या संस्थेची स्थापना केली.
साहित्यसम्राट न. चि. केळकर हे संस्थेचे पहिले अध्यक्ष झाले. त्यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनाखाली तसेच रावबहादूर आचरेकर यांच्यासारख्या ध्येयवेड्या व्यक्तिमत्त्वांच्या अथक प्रयत्नांतून संस्थेच्या प्रगतीची भक्कम वाटचाल सुरू झाली

महत्त्वाचे

बोर्ड इन्स्टिट्यूट्स

मिलिंद सदानंद पवार पूर्व प्राथमिक शाळा, देवगड

मिलिंद सदानंद पवार पूर्व प्राथमिक शाळा, देवगड
( सेमी-इंग्रजी / खाजगी)
आयएसओ प्रमाणपत्र क्रमांक: १०२२९०२२४

चित्रकार प्रथमेश राजेंद्र हिंदळेकर बालविभाग, देवगड

चित्रकार प्रथमेश राजेंद्र हिंदळेकर बालविभाग, देवगड
(मराठी माध्यम/ विनाअनुदानित)
आयएसओ प्रमाणपत्र क्रमांक: १०२२९०२२४

शेठ मफतलाल गगलभाई हायस्कूल, देवगड

शेठ मफतलाल गगलभाई हायस्कूल देवगड
(मराठी, सेमी-इंग्लिश माध्यम/ अनुदानित)
आयएसओ प्रमाणपत्र क्रमांक: १०२२९०२२४

देवगड कला, वाणिज्य आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, देवगड

देवगड कला, वाणिज्य आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, देवगड
(मराठी माध्यम/ विनाअनुदानित)
आयएसओ प्रमाणपत्र क्रमांक: १०२२९०२२४

अनंत कृष्ण केळकर हायस्कूल, वाडा

अनंत कृष्ण केळकर हायस्कूल, वाडा
(मराठी आणि सेमी इंग्लिश माध्यम/ अनुदानित)
आयएसओ प्रमाणपत्र क्रमांक: ९००१२०२३

एन. जी. कुलकर्णी टेकनिकल स्कूल , देवगड

एन. जी. कुलकर्णी टेकनिकल स्कूल , देवगड
(मराठी माध्यम/विनाअनुदानित)
आयएसओ प्रमाणपत्र क्रमांक: १०२२९०२२४

देवगड एज्युकेशन बोर्डाच्या विविध संस्थांच्या माजी विद्यार्थ्यांना, ‘माजी विद्यार्थी परिवारात’ सहभागी होण्यासाठी मनःपूर्वक आमंत्रण.
या माध्यमातून आपल्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देत आपण वर्गमित्र, शिक्षक आणि संस्थेशी पुन्हा एकदा जोडले जाल. तसेच, आपल्या अनुभवातून सध्याच्या विद्यार्थ्यांना प्रेरणा व मार्गदर्शन देण्याची संधीही मिळेल.
देवगड एज्युकेशन बोर्डाशी जुळलेले नाते हे आयुष्यभर जपले जाणारे एक अतूट बंधन आहे. या प्रेरणादायी प्रवासात आपणही सहभागी व्हावे, हीच अपेक्षा.

शिक्षणासाठी केलेली प्रत्येक मदत ही केवळ देणगी नसून, ती उज्ज्वल भविष्याच्या उभारणीसाठी केलेली अर्थपूर्ण गुंतवणूक आहे.
आपला मौल्यवान पाठिंबा ग्रामीण कोकणातील विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या शैक्षणिक उपक्रमांना बळ देतो आणि उद्याच्या सक्षम, सुशिक्षित व आत्मविश्वासपूर्ण पिढीच्या घडणीत थेट योगदान ठरतो.
आपल्या सहकार्यामुळे संस्थेचे अनेक शैक्षणिक उपक्रम पूर्णत्वास जातात, आर्थिक अडथळे दूर होतात आणि विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना नवी दिशा मिळते. देणगीची रक्कम लहान असो वा मोठी, प्रत्येक योगदान विद्यार्थ्यांच्या आयुष्यात सकारात्मक परिवर्तन घडवत समाजाच्या प्रगतीलाही नवी चालना देते.
या ज्ञानयज्ञात आपलेही योगदान लाभावे, यासाठी आपण आमच्या सुरक्षित पोर्टलद्वारे करसवलतीस पात्र देणगी देऊन या उपक्रमात सहभागी व्हावे, ही नम्र विनंती.

आमच्या संस्थेचे आधारस्तंभ

देवगड एज्युकेशन बोर्डाची स्थापना ९ डिसेंबर १९३३ रोजी मुंबई येथे झाली. साहित्यसम्राट कै. न. चिं. (तात्यासाहेब) केळकर हे संस्थेचे पहिले अध्यक्ष होते. देवगड तालुक्यात शिक्षणप्रसाराची संघटित चळवळ उभी करणारी ही पहिली संस्था ठरली. स्वातंत्र्यलढ्याच्या काळात शिक्षणाचे महत्त्व ओळखून देवगड तालुक्यातील शिक्षणप्रेमी व दूरदर्शी व्यक्तींनी एकत्र येत या संस्थेची स्थापना केली. या उपक्रमातून तालुक्याच्या शैक्षणिक इतिहासात एका नव्या युगाची सुरुवात झाली.

कार्यरत वर्षे

शिक्षक आणि कर्मचारी

संस्थेच्या शाळा व कॉलेज

विद्यार्थी

संपर्क

पत्ता: C/O  श्री. जितेंद्र डी. तावडे,
१, उद्यान विकास सीएचएस लि.,
तेजपाल स्कीम रोड नंबर २, विलेपार्ले (पूर्व),
मुंबई ४०००५७

दूरध्वनी: +९१-९८३३४३१२७४

ईमेल: devgadeducationboard@gmail.com