Select Page

अनंत कृष्ण केळकर हायस्कूल

वाडा (मराठी आणि सेमी इंग्लिश माध्यम/ अनुदानित)

आयएसओ प्रमाणपत्र क्रमांक: ९००१२०२३

अनंत कृष्ण केळकर हायस्कूल बद्दल

ग्रामीण भागात शिक्षणाचा प्रकाश पोहोचविण्याच्या उदात्त ध्येयातून अनंत कृष्ण केळकर हायस्कूल, वाडे–देवगडची स्थापना झाली. श्री. दीक्षित गुरुजी, रावबहादूर आचरेकर यांसारख्या शिक्षणनिष्ठ व दूरदर्शी व्यक्तिमत्त्वांच्या अथक प्रयत्नांना श्री. जगन्नाथ अनंत केळकर आणि श्री. अरविंदभाई मफतलाल यांसारख्या दानशूर व्यक्तींचे उदार सहकार्य लाभले आणि या शैक्षणिक स्वप्नाला भक्कम आकार प्राप्त झाला.
सन १९५५ मध्ये ‘माध्यमिक शाळा’ म्हणून सुरू झालेल्या या संस्थेचे सन १९५८ मध्ये ‘अनंत कृष्णा केळकर हायस्कूल’ असे नामकरण करण्यात आले. तेव्हापासून देवगड एज्युकेशन बोर्डाच्या मार्गदर्शनाखाली ज्ञान, संस्कार, गुणवत्ता आणि सर्वांगीण विकास यांची समृद्ध परंपरा येथे जोपासली जात आहे.
आज विद्यालयात इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंत मराठी व सेमी-इंग्रजी माध्यमातून शिक्षण दिले जाते. वाडे व परिसरातील असंख्य विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जडणघडणीत या विद्यालयाचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. दहावीच्या बोर्ड परीक्षेसाठी मान्यताप्राप्त केंद्र असलेल्या या विद्यालयात शिष्यवृत्ती परीक्षा, विविध विषयांवरील स्पर्धा, संस्कृत भगवद्गीता पठण तसेच शैक्षणिक, सांस्कृतिक आणि व्यक्तिमत्त्व विकासाला चालना देणारे अनेक उपक्रम नियमितपणे राबविले जातात.
शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी चित्रकला व रेखाटन विभाग कार्यरत आहे. तसेच ‘कला भारती’ ललितकला विभागाच्या माध्यमातून गायन, वाद्यवादन आणि नाट्यकलेचे प्रशिक्षण दिले जाते. संगणक शिक्षण, विज्ञानविषयक उपक्रम आणि प्रयोगशील शिक्षणपद्धती यांच्या साहाय्याने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला सक्षम दिशा दिली जाते.
नव्या युगाच्या गरजा ओळखून संस्था रोबोटिक्स, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि कौशल्याधिष्ठित शिक्षणाच्या नव्या वाटा खुल्या करण्यासाठी प्रयत्नशील आहे. विद्यार्थ्यांना भविष्यातील आव्हानांना समर्थपणे सामोरे जाण्यासाठी आवश्यक ज्ञान, कौशल्ये आणि आत्मविश्वास प्रदान करणे हेच संस्थेचे ध्येय आहे.
माजी विद्यार्थी, ग्रामस्थ, पालक आणि दानशूर व्यक्ती यांच्या अखंड सहकार्यामुळे संस्थेची ही यशस्वी वाटचाल अधिक समृद्ध होत गेली आहे. त्यांच्या विश्वास, आपुलकी आणि पाठबळातूनच विद्यालयाची उज्ज्वल परंपरा बहरत असून, भविष्यातील प्रगतीसाठी हेच सहकार्य प्रेरणास्रोत ठरत राहील.

सुविधा

  • शिक्षक कक्ष :

  • वर्गखोल्या:

  • ड्रॉईंग हॉल

  • असेंब्ली हॉल

  • दुपारचे पौष्टिक जेवण :
    इयत्ता ५ वी ते ८ वी साठी

  • प्रयोगशाळा

  • ग्रंथालय :सुमारे ३००० पुस्तके

  • संगणक प्रयोगशाळा : २० संगणक

  • पटांगण

  • प्रोजेक्टर

  • शाळेची वेळ: :सकाळी १० ते दुपारी ४

A K Kelkar highschool

Assembly Hall

Play Ground

उपक्रम

रोबोटिक्स एआय (Robotics AI)

शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून, अनंत कृष्ण केळकर हायस्कूल वाडा हे विद्यार्थ्यांना प्रगत तंत्रज्ञानाची ओळख करून देण्यासाठी “रोबोटिक्स एआय” (Robotics AI) हा नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू करत आहे.
देवगड एज्युकेशन बोर्ड मुंबई आणि वाडा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच गरूड टेकच्या (Garud Tech) मार्गदर्शनाखाली आयोजित या अभ्यासक्रमात खालील घटकांचा समावेश आहे:
रोबोटिक्स: डिझाइन आणि डेव्हलपमेंट ट्रॅकिंग.
इंटेलिजन्स: कोअर आर्टिफिशियल इंटेलिजन्स (कृत्रिम बुद्धिमत्ता) आणि मशीन लर्निंग.
कोडिंग: ‘सी’ (C), ‘सी++’ (C++) आणि ‘पायथन’ (Python) यांसह प्रोग्रामिंग भाषा.
ऑटोमेशन: स्मार्ट तंत्रज्ञान आणि स्वयंचलित प्रणाली.
हा कार्यक्रम विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता, वैज्ञानिक विचार आणि भविष्यासाठी आवश्यक तांत्रिक कौशल्ये विकसित करण्यासाठी प्रत्यक्ष तांत्रिक अनुभव प्रदान करतो.

कौशल्यविकास

अनंत कृष्ण केळकर हायस्कूल, वाडा येथे कौशल्य विकास कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमाद्वारे व्यावहारिक व्यवसाय प्रशिक्षण आणि नियमित शालेय शिक्षण यांचा संगम साधला जात असून ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी शिक्षण अधिक व्यवसाय केंद्रित आणि उपयुक्त बनवले जात आहे.
हा अभ्यासक्रम पारंपरिक शिक्षण आणि जीवनातील कौशल्ये यांतील दरी कमी करून रोजगारक्षमता, उद्योजकता, आत्मविश्वास वाढविणे तसेच शाळा सोडणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण कमी करणे यावर लक्ष केंद्रित करतो.
अभ्यासक्रमातील चार प्रमुख क्षेत्रे
1. मूलभूत कार्यशाळा व अभियांत्रिकी तंत्रज्ञान
2. मूलभूत ऊर्जा व पर्यावरण
3. मूलभूत कृषी व पशुपालन
4. अन्न प्रक्रिया
हा उपक्रम स्थानिय समिती , वाडा आणि “ Cause to connect foundation “ संस्था पुणे
प्रयत्नांतून राबविण्यात आला असून खालील उदार देणग्यांनी तो प्रत्यक्षात उतरला आहे:
• श्री. निरंजन दीक्षित , दीक्षित फाउंडेशन – ₹१.४० लाख (श्री. नीलकंठ श्रीधर दीक्षित यांच्या स्मरणार्थ, )
• श्री. अरुण ज . जोशी – ₹१ लाख
• श्री. जितेंद्र द . तावडे – ₹3५,०००
• श्री. भूषण वेगुर्लेकर – ₹२५,०००

कलाभारती

अनंत कृष्ण केळकर हायस्कूल, वाडा येथे विद्यार्थ्यांना ललित कलांचे शिक्षण देण्यासाठी कलाभारती दालन स्थापन करण्यात आले. हा उपक्रम , शाळा समितीचे अध्यक्ष हर्षद जोशी यांच्या पुढाकाराने आणि स्थानिय समितीचे अध्यक्ष श्री. शांताराम टी. पुजारी यांच्या सक्षम मार्गदर्शनाखाली सुरु केलेला आहे. भगीरथ प्रतिष्ठान, झारापचे अध्यक्ष डॉ. प्रसाद देवधर यांच्या उदार देणगीतून हे दालन सुसज्ज करण्यात आले.
२६ नोव्हेंबर २०२५ रोजी डॉ. प्रसाद देवधर, ज्येष्ठ गायिका श्रीमती अनिता आगाशे आणि दीक्षित फाउंडेशनचे अध्यक्ष श्री. निरंजन दीक्षित यांच्या उपस्थितीत या दालनाचे उद्घाटन करण्यात आले.
ठळक वैशिष्ट्ये
स्थापनेपासून कलाभारती विभागाने अनेक प्रभावी उपक्रम राबविले आहेत:
आकाशवाणी रत्नागिरी प्रसारण – निवडक विद्यार्थ्यांनी सादर केलेला गीत कार्यक्रम आकाशवाणी रत्नागिरीवर प्रसारित झाला.
“उधळीत शतकिरणा” कार्यशाळा – प्रख्यात संगीततज्ज्ञा डॉ. शीतल धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित संगीत कार्यशाळेत वाडा हायस्कूलसह इतर शाळांतील विद्यार्थी, ग्रामस्थ आणि संगीतप्रेमींनी सहभाग घेतला. यात समूहगीतांचे प्रशिक्षण आणि मूलभूत सांगीतिक संकल्पनांचे ज्ञान देण्यात आले.
बालसंस्कार शिबीर (२३–३० एप्रिल २०२६) – शाळा व आसपासच्या संस्थांतील विद्यार्थ्यांना स्वसंरक्षण, स्तोत्रपठण, कला आणि व्यक्तिमत्त्व विकास याबाबत मोफत मार्गदर्शन देणारा उपक्रम.
शालेय कार्यक्रमांतील सहभाग – कलाभारती विभागातील विद्यार्थी स्वागतगीत आणि ईशस्तवन सादर करतात.

 

शिक्षकवर्ग, इतर कर्मचारी आणि समिती

शिक्षकवर्ग आणि इतर कर्मचारी

स्थानिय आणि शाळा समिती

निकाल

निकाल २०२५-२६

निकाल २०२४-२५

निकाल २०२३-२४

कर्तृत्वगाथा (विद्यार्थी आणि शिक्षक)

इव्हेंट गॅलरी

संपर्क तपशील

शाळेचा पत्ता

अनंत कृष्ण केळकर  हायस्कूल,
मु.पो. वाडा ,
तालुका देवगड
जि. सिंधुदुर्ग, महाराष्ट्र ४१६८०५

संपर्क क्रमांक

९१३०८४७२११

2 + 15 =