Select Page

माजी विद्यार्थी

देवगड एज्युकेशन बोर्डाच्या विविध संस्थांच्या माजी विद्यार्थ्यांना,  ‘माजी विद्यार्थी परिवारात’ सहभागी होण्यासाठी मनःपूर्वक आमंत्रण.
या माध्यमातून आपल्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देत आपण वर्गमित्र, शिक्षक आणि संस्थेशी पुन्हा एकदा जोडले जाल. तसेच, आपल्या अनुभवातून सध्याच्या विद्यार्थ्यांना प्रेरणा व मार्गदर्शन देण्याची संधीही मिळेल.
देवगड एज्युकेशन बोर्डाशी जुळलेले नाते हे आयुष्यभर जपले जाणारे एक अतूट बंधन आहे. या प्रेरणादायी प्रवासात आपणही सहभागी व्हावे, हीच अपेक्षा.